वाहतूककोंडीने नवी मुंबईकर हैराण; वाहनांच्या संख्येत वाढ झाल्याने नियोजन कोलमडले

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात शुक्रवारपासून जागोजागी वाहतूककोंडी होत आहे. दिवाळी सुट्टी आणि होणारी वाहतूककोंडी पाहता वाहतूक पोलीस विभागाने उपाययोजना केल्या होत्या. त्यामुळे वाहतूककोंडी होणार नाही असा दावा करण्यात आला होता.
वाहतूककोंडीने नवी मुंबईकर हैराण; वाहनांच्या संख्येत वाढ झाल्याने नियोजन कोलमडले
Published on

नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात शुक्रवारपासून जागोजागी वाहतूककोंडी होत आहे. दिवाळी सुट्टी आणि होणारी वाहतूककोंडी पाहता वाहतूक पोलीस विभागाने उपाययोजना केल्या होत्या. त्यामुळे वाहतूककोंडी होणार नाही असा दावा करण्यात आला होता. मात्र दिवाळीच्या सलग सुट्ट्या, वाहन संख्येत झालेली अनपेक्षित वाढ, त्यात मुख्य मार्गावर होणारे लहान-मोठे अपघात आणि त्यात बेशिस्त वाहन चालकांमुळे वाहतुकीचे तीन तेरा वाजले होते.

सोमवारपासून वाहतूककोंडीतून काहीसा दिलासा मिळाला असून मंगळवारी पुन्हा वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक पोलीस, विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

वाहतूक पोलीस विभागाने वाहतूक कोंडीची ठिकाणी शोधून बंदोबस्त लावला होता. मात्र ठाणे-बेलापूर मार्ग, शीव-पनवेल महामार्ग, पाम बीच, रबाळे शिरवाने, एमआयडीसीच्या अंतर्गत मार्गावर वाहतूककोंडी झाली होती.

बाजार ठिकाणी वाहतूककोंडी रोखण्यात बऱ्यापैकी यश आले. मात्र ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईकडून राज्याच्या अन्य भागात जाणाऱ्या गाड्यांच्या संख्येत अनपेक्षित वाढ, त्यात मॅपवर कमी वाहतूक दाखवल्याने मुंबईकडून पनवेलकडे जाणाऱ्या हलक्या वाहनांचा पाम बीच मार्गे वापर, छोटे अपघात, अनेक ठिकाणी गाड्या बंद पडणे अशा कारणांनी वाहतूककोंडी होत आहे. त्यावर तत्काळ उपाययोजना केल्या जातात. - तिरुपती काकडे, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग

logo
marathi.freepressjournal.in