Navi Mumbai : मोबाईल चोरीच्या संशयावरून तरुणाची हत्या; तुर्भे पोलिसांनी दोघांना केली अटक

तुर्भे परिसरात मोबाईल चोरीच्या केवळ संशयावरून दोन व्यक्तींनी एकाच परिसरातील तरुणावर बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत व्यक्तीचे नाव सुधाकर पाटोळे असून, तुर्भे पोलिसांनी संशयित अर्जुन अडागळे आणि विधान मंडळ या दोघांना अटक केली आहे.
Navi Mumbai : मोबाईल चोरीच्या संशयावरून तरुणाची हत्या; तुर्भे पोलिसांनी दोघांना केली अटक
Navi Mumbai : मोबाईल चोरीच्या संशयावरून तरुणाची हत्या; तुर्भे पोलिसांनी दोघांना केली अटकप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

नवी मुंबई : तुर्भे परिसरात मोबाईल चोरीच्या केवळ संशयावरून दोन व्यक्तींनी एकाच परिसरातील तरुणावर बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत व्यक्तीचे नाव सुधाकर पाटोळे असून, तुर्भे पोलिसांनी संशयित अर्जुन अडागळे आणि विधान मंडळ या दोघांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना १० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

घटनेनुसार, सहा नोव्हेंबर रोजी सकाळी सातच्या सुमारास तिघेही नवजीवन विद्यालयाजवळील सार्वजनिक स्वच्छतागृहाजवळ भेटले. यावेळी अडागळे याचा मोबाईल हरवला. परिसरात शोधूनही मोबाईल न सापडल्याने तो मोबाईल सुधाकर पाटोळे यांनी घेतल्याचा संशय अडागळेला आला. विचारणा करताच वादावादी झाली आणि दोघा संशयितांनी शिवीगाळ करत त्याला धमकावले.

वाद वाढताच अडागळे आणि मंडल यांनी रागाच्या भरात जवळच पडलेले बांबू आणि पाइप उचलून सुधाकरवर बेदम मारहाण केली. मारहाणीत तो गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडला.

आरोपी दोघेही त्याला तिथेच सोडून पळून गेले. माहिती मिळताच तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुधाकरला तातडीने वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून हा सर्व प्रकार मोबाईल चोरीच्या संशयातून झाल्याचे सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in