उद्धव ठाकरे गटाला उरणमध्ये खिंडार; दीपक ठाकूर यांच्यासह अनेक कार्यकर्ते शिंदेंच्या शिवसेनेत

उद्धव ठाकरे यांच्या उरण येथील सभेआधीच शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
उद्धव ठाकरे गटाला उरणमध्ये खिंडार;
दीपक ठाकूर यांच्यासह अनेक कार्यकर्ते शिंदेंच्या शिवसेनेत

उरण : उद्धव ठाकरे यांच्या उरण येथील सभेआधीच शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

उरण पंचायत समिती सदस्य आणि युवासेना तालुका प्रमुख दीपक ठाकूर, माजी पं. स. सभापती चंद्रकांत पाटील, उबाठा गटाचे उलवे शहर प्रमुख प्रथम पाटील, विजय भिसे, पनवेलमधून क्षितिज शिंगरे, अक्षय म्हात्रे (करंजा) अनिकेत पाटील (पुनाडे) अनेक शाखा प्रमुख, युवा कार्यकर्त्यांनी रविवार शिवसेनेत प्रवेश केला आहे.

युवासेना सचिव तथा उपजिल्हा प्रमुख रूपेश पाटील यांच्या माध्यमातून हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. यावेळी शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के, उपजिल्हा प्रमुख अतुल भगत, उरण विधानसभा प्रमुख मनोज घरत, रोशन पवार, तालुका प्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते. या पक्षप्रवेशामुळे उद्धव ठाकरेंच्या सभेअगोदर अपशकुन करण्यात आला आहे. दीपक ठाकूर हे मागील अनेक महिन्यांपासून नाराज होते. माजी आमदार मनोहर भोईर आणि तालुका पातळीवरील पदाधिकाऱ्यांवरील नाराजीमुळे त्यांनी हा पक्षप्रवेश केल्याचे बोलले जाते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in