Navi Mumbai : तलावात पैसे काढण्यासाठी उतरलेल्या दोन मुलांचा मृत्यू

नवरात्रोत्सवात देवीच्या मूर्ती आणि घटांच्या विसर्जनानंतर तलावात वाहिलेले पैसे काढण्यासाठी पाण्यात उतरलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (दि. २१) सकाळी वाशीतील कोपरी गाव तलावात घडली.
Navi Mumbai : तलावात पैसे काढण्यासाठी उतरलेल्या दोन मुलांचा मृत्यू
Navi Mumbai : तलावात पैसे काढण्यासाठी उतरलेल्या दोन मुलांचा मृत्यूX | व्हिडिओवरून घेतलेला स्क्रीनशॉट
Published on: 

नवी मुंबई : नवरात्रोत्सवात देवीच्या मूर्ती आणि घटांच्या विसर्जनानंतर तलावात वाहिलेले पैसे काढण्यासाठी पाण्यात उतरलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (दि. २१) सकाळी वाशीतील कोपरी गाव तलावात घडली. गणेश सुजित गुप्ता (९) आणि गोलू मन्सूरी (१०) अशी मृत मुलांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मंगळवारी कोपरी गाव तलावात देवीच्या मूर्ती आणि घटांचे विसर्जन करण्यात आले होते. विसर्जनावेळी तलावात वाहिलेले पैसे काढण्यासाठी बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास गणेश आणि गोलू मित्रांसोबत तलावात उतरले. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. या मोहिमेदरम्यान दोन्ही मुलांचे मृतदेह सापडले. पुढील कार्यवाहीसाठी मृतदेह वाशी रुग्णालयात पाठविण्यात आले.

या तलावात लहान मुले पोहण्यासाठी उतरत असल्याने येथे सुरक्षा रक्षक तैनात करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती. या दुर्घटनेनंतर तलाव परिसरातील सुरक्षाव्यवस्था, धोक्याचे सूचना फलक आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in