नवी मुंबई : पाणी जपून वापरा; १८ तास पाणीपुरवठा बंद

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणारी १७०० मिमी व्यासाची पामबीच मार्गालगत असलेल्या मोरबे मुख्य जलवाहिनीवर नेरूळ सेक्टर-४६, अक्षर बिल्डिंगजवळ वारंवार गळती होत आहे.
नवी मुंबई : पाणी जपून वापरा; १८ तास पाणीपुरवठा बंद
Published on

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणारी १७०० मिमी व्यासाची पामबीच मार्गालगत असलेल्या मोरबे मुख्य जलवाहिनीवर नेरूळ सेक्टर-४६, अक्षर बिल्डिंगजवळ वारंवार गळती होत आहे. त्यामुळे या ठिकाणी नवीन जलवाहिनी टाकण्यात आलेली असून, नवीन जलवाहिनी जुन्या जलवाहिनीला दोन्ही बाजूस जोडणीचे काम शुक्रवार, दि. १८ जुलै रोजी हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी शुक्रवार दि. १८ जुलै सकाळी वाजल्यापासून शनिवार, दि. १९ जुलै रोजी पहाटे ४.०० वाजेपर्यंत १८ तासांकरिता मुख्य जलवाहिनीवरील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली या विभागामध्ये तसेच नमुंमपा क्षेत्रातील मुख्य जलवाहिनीवरील थेट नळ जोडण्यांचा व सिडको क्षेत्रातील खारघर व कामोठे नोड मधील पाणीपुरवठा बंद राहील. शुक्रवार, दि. १८ जुलै रोजी संध्याकाळचा व शनिवार दि. १९ जुलै रोजी सकाळचा पाणी पुरवठा होणार नाही, तसेच शनिवार दि.१९ जुलै रोजी संध्याकाळी कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावयाची आहे.

logo
marathi.freepressjournal.in