Video : प्रेम प्रकरणातून तरुणीची फ्लायओव्हरवरून थेट नदीत उडी, नवी मुंबईतील धक्कादायक घटना

नवी मुंबईतील तळोजा परिसरात फेज एक आणि फेज दोनला जोडणाऱ्या फ्लायओव्हरवर ही घटना घडली.
Video : प्रेम प्रकरणातून तरुणीची  फ्लायओव्हरवरून थेट नदीत उडी, नवी मुंबईतील धक्कादायक घटना

नवी मुंबईत एक धक्कादायक घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. एका तरुणीने फ्लायओव्हरवरून नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

तरुणी फ्लायओव्हरवरून उडी मारण्याच्या तयारीत असताना नागरिकांनी तिला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. ती फ्लायओव्हरच्या कठड्यावर उभी असतानाच उडी मारू नकोस असे लोक समजावत होते. पण, तितक्यात कोणाला काही कळायच्या आत तिने थेट पाण्यात उडी घेतली.

ही घटना नवी मुंबईतील तळोजा परिसरात फेज एक आणि फेज दोनला जोडणाऱ्या फ्लायओव्हरवरवर घडली. प्रेम प्रकरणातून तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे. पण, इतकं टोकाचं पाऊल का उचलावे लागले हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. सुदैवाने तिला वाचवण्यात यश आलं आहे. ती वैद्यकीय देखरेखीखाली असून प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in