डम्पर-दुचाकीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; डम्परचालकाला अटक

शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास शीव-पनवेल मार्गावर बेलापूर उड्डाणपुलानजीक अपघात झाला.
डम्पर-दुचाकीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; डम्परचालकाला अटक

नवी मुंबई : शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास शीव-पनवेल मार्गावर बेलापूर उड्डाणपुलानजीक अपघात झाला. डम्पर आणि दुचाकी यात झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे.

आरिफ शेख असे अटक करण्यात आलेल्या डम्परचालकाचे नाव आहे. तर मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव अभिषेक मांजरेकर असे त्याचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास भरधाव वेगाने डम्पर वाशीहून पनवेलच्या दिशेने जात होता. बेलापूर खिंडीतील उड्डाणपूल ओलांडून सदर डम्पर पुढे जात असताना त्यांच्या डावीकडून असणाऱ्या दुचाकीकडे त्याचे लक्ष गेले नाही आणि एका बाजूने धडकला. त्यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. घटना कळताच वाहतूक पोलीस आणि सीबीडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी डम्परचालक आरिफ शेख याला अटक केली आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in