पिस्तूल विक्रीसाठी आलेला तरुण अटकेत; पोलिसांनी सापळा रचून घेतले ताब्यात

पनवेल रेल्वे स्थानकाजवळ पिस्तूल विक्री करण्यासाठी आलेल्या एका तरुणाला पनवेल शहर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे.
पिस्तूल विक्रीसाठी आलेला तरुण अटकेत; पोलिसांनी सापळा रचून घेतले ताब्यात

नवी मुंबई : पनवेल रेल्वे स्थानकाजवळ पिस्तूल विक्री करण्यासाठी आलेल्या एका तरुणाला पनवेल शहर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. अंकित सुरेश कुमार (२३) असे या तरुणाचे नाव असून पोलिसांनी त्याच्याजवळ असलेले पिस्तूल व दोन जिवंत काडतूस जप्त केले आहे. सदरचे पिस्तूल त्याने कुठून आणले व ते कोणाला विक्री करणार होता. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

पनवेल रेल्वे स्थानकाजवळ एक व्यक्ती अग्निशस्त्र विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल स्थानकाबाहेरील पार्किंगमध्ये सापळा रचण्यात आला. यावेळी रेल्वेने प्रवास करून आलेल्या संशयित अंकित सुरेश कुमारला पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला असता, त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याजवळ असलेल्या बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये एक पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे पोलिसांनी अंकित कुमारच्या जवळ सापडलेले पिस्तूल व काडतूस जप्त करून त्याला अटक केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in