ईडीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आज आंदोलन

संघर्ष करणाऱ्या आपल्या अनेक लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात असून आमदार रोहित पवार यांच्यावर ईडीकडून केल्या जाणाऱ्या कारवाईविरोधात गुरुवार १ फेब्रुवारी रोजी बेलापूर येथील कोकण भवन येथे आंदोलन करण्यात येणार आहे.
ईडीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आज आंदोलन
Published on

नवी मुंबई : आपण सर्वजण लोकांच्या हितासाठी आणि महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी संघर्ष करत आहोत. पण संघर्ष करणाऱ्या आपल्या अनेक लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात असून आमदार रोहित पवार यांच्यावर ईडीकडून केल्या जाणाऱ्या कारवाईविरोधात गुरुवार १ फेब्रुवारी रोजी बेलापूर येथील कोकण भवन येथे आंदोलन करण्यात येणार आहे.

यावेळी सर्वसामान्य लोकांच्या हिताचे मुद्दे घेऊन लढत असल्याने या आंदोलनाच्या माध्यमातून लोकांच्या प्रश्नावर जोरदार आवाज उठवणार असून झोपेचे सोंग घेणाऱ्या या सरकारला जागे करायचे असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in