क्षुल्लक कारणावरून एनएमएमटी बसचालक-वाहकाला मारहाण

बाईकला धक्का मारल्याच्या कारणावरून बसचालक सत्यवान खैरे याला शिवीगाळ करत बसमधून खाली उतरवले.
क्षुल्लक कारणावरून एनएमएमटी बसचालक-वाहकाला मारहाण

नवी मुंबई : मोटारसायकलला कट मारल्याच्या कारणावरून दोघा बाईकस्वारांनी एनएमएमटी बसच्या चालकाला व वाहकाला भररस्त्यात लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घणसोलीतील टेम्पटेशन चौकात घडली. या मारहाणीत जखमी झालेल्या नवी मुंबई महापालिका परिवहन सेवेतील वाहकाचे नाव अमोल जाधव (३४) तर चालकाचे नाव सत्यवान खैरे (२९) हे दोघेही गत १ जानेवारी रोजी घणसोली ते वाशी रेल्वे स्थानक या ९ नंबरच्या मार्गावरील बसवर कार्यरत होते. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास त्यांची बस घणसोली डी-मार्ट, घरोंदा येथून वाशीच्या दिशेने जात असताना, टेम्पटेशन चौकात आली असताना, मोटारसायकलवरून आलेल्या विक्की जाधव व निखील धुमाळ या दोघांनी बस थांबवली. त्यानंतर दोघांनी बसमध्ये घुसून त्यांच्या बाईकला धक्का मारल्याच्या कारणावरून बसचालक सत्यवान खैरे याला शिवीगाळ करत बसमधून खाली उतरवले. त्यानंतर त्या दोघांनी बसचालकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. यावेळी वाहक अमोल जाधवला सोडवण्यासाठी गेला असता, त्याला देखील विक्की जाधव व निखील धुमाळ या दोघांनी बेदम मारहाण केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in