
टीपीजी कृष्णन / नवी मुंबई
निवृत्तीनंतर नव्या कारकीर्दीसाठी शुभेच्छांसह निरोप देण्याची प्रथा आहे. मात्र त्याच आस्थापनेत दुसऱ्या विभागात झालेली बदली एका बसचालकासाठी सुखद ठरली.
एनएमएमटीच्या बस क्रमांक १०८ चे चालक वाल्मिकी नागरे यांची बदली परिवहन विभागाच्या नियंत्रण शाखेत झाली. तत्पूर्वी नवी मुंबई ते वर्ल्ड ट्रेड सेंटर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी नागरे यांनी प्रवाशांनी केलेल्या सत्काराने भावनिक निरोप घेतला. नागरे हे एनएमएमटीच्या परिवहन सेवेत दीर्घकाळ प्रवाशांची सेवा करत असून त्यांच्या नम्र, सौजन्यशील, मदतीस तत्पर आणि प्रवाशांप्रती समंजस वागणुकीसाठी ते ओळखले जातात.
एनएमएमटीमध्ये अनेक वर्षे काम केलेले नागरे यांची नियंत्रण विभागात बदली झाली असून ते फेब्रुवारी २०२६ मध्ये सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांनी सांगितले की, प्रवाशांनी दिलेल्या प्रेमासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, मी खूप आनंदित आणि भारावलेलो आहे. आम्ही सर्व एकाच कुटुंबाचे सदस्य आहोत.