आपटा ग्रामपंचायतीच्या सरपंचाविरोधात अविश्वास ठराव मंजूर

गेली अनेक वर्षे आपटा ग्रामपंचायतीवर शेकाप व अलीकडे काही वर्षे ठाकरे गट पर्यायाने महाविकास आघाडीचे वर्चस्व राहिले आहे, पण आता ही ग्रामपंचायत भारतीय जनता पक्षाच्या बाजूने झाली आहे.
आपटा ग्रामपंचायतीच्या सरपंचाविरोधात अविश्वास ठराव मंजूर
Published on

उरण : पनवेल तालुक्यातील व उरण विधानसभा मतदारसंघातील आपटा ग्रामपंचायतीच्या उद्धव ठाकरे गटाच्या सरपंच नाजनीन खलील पटेल यांच्या विरोधातील अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. सरपंच नाजनीन पटेल यांच्या विरोधात १० मते, तर बाजूने केवळ तीन मते पडली.

गेली अनेक वर्षे आपटा ग्रामपंचायतीवर शेकाप व अलीकडे काही वर्षे ठाकरे गट पर्यायाने महाविकास आघाडीचे वर्चस्व राहिले आहे, पण आता ही ग्रामपंचायत भारतीय जनता पक्षाच्या बाजूने झाली आहे.

सरपंचाविरोधातील अविश्वास ठरावावर घेण्यात आलेल्या मतदानावेळी अप्पर तहसीलदार इंगळे, मंडल अधिकारी कारेगावकर, ग्रामविकास अधिकारी गणेश गायकर तसेच रसायनी पोलीस अधिकारी, पोलीस पाटील उपस्थित होते. त्याचप्रमाणे भाजप नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत, भाजप केळवणे विभागीय अध्यक्ष मंगेश वाकडीकर, राजू पाटील, विद्याधर जोशी, प्रवीण काळबागे, दत्ता पाटील, ॲड. निलेश हातमोडे, ॲड. आकाश, ज्ञानेश्वर भोईर, दर्शन भोईर, लक्ष्मण बावधने, राजा देशमुख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.

नाजनीन खलील पटेल यांच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांमध्ये नाराजी होती, याची दबक्या आवाजात पण मोठी चर्चा होती.

logo
marathi.freepressjournal.in