अटल सेतुवर ड्रोन उडविल्याप्रकरणी एकाला अटक

याप्रकरणी नवी मुंबई पोलीस दलातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, नवी मुंबई पोलिसांनी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोडवर ड्रोनच्या वापरावर प्रतिबंधात्मक आदेश जारी केले
अटल सेतुवर ड्रोन उडविल्याप्रकरणी एकाला अटक

नवी मुंबई: नवी मुंबई पोलिसांनी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोडवर(अटल सेतुवर) ड्रोन उडविल्याच्या आरोपाखाली २५ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. अहमद मोहिउद्दीन सिद्दीकी असे या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, पोलिसांनी त्या तरुणाचा ड्रोन जप्त केला आहे. याप्रकरणी नवी मुंबई पोलीस दलातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, नवी मुंबई पोलिसांनी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोडवर ड्रोनच्या वापरावर प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

या आदेशाचे उल्लंघन अहमद सिद्दीकी या तरुणाने केले असून, २२ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६.३० च्या सुमारास अहमद सिद्दीकी या तरुणाने ट्रान्स हार्बर लिंक रोडवर ड्रोन उडविला होता. त्यातील 'डीजीआय मिनीप्रो ३ ड्रोन' पोलिसांनी जप्त केला आहे. न्हावा शेवा पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, सिद्दीकी यांच्याविरुद्ध शुक्रवारी भारतीय दंड संहितेनुसार आणि मोटार वाहन कायद्यानुसार त्याचे वाहन नो-पार्किंग झोनमध्ये थांबवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in