कोपरखैरणे येथे इमारत कोसळून एकाचा मृत्यू

महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य केले
कोपरखैरणे येथे इमारत कोसळून एकाचा मृत्यू
Published on

कोपरखैरणे नोडमधील बोनकोडे गावातील चार मजली इमारत शनिवारी रात्री १०.४५ वाजण्याच्या सुमारास कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबून एका व्यक्तीचा मृत्यू, तर इमारतीच्या बाजूने जाणारा एक व्यक्ती जखमी झाला आहे. महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य केले. शनिवारी रात्रभर व रविवारीही ढिगारा उपसण्याचे काम सुरू होते.

१५ वर्षे जुन्या असलेल्या या इमारतीत ३४ कुटुंबे राहत होती. सदर इमारत धोकादायक झाल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शनिवारी दिवसा ही इमारत रिकामी केली होती; मात्र शनिवारी रात्री साईप्रसाद ही इमारत अखेर कोसळली. या इमारतीत त्यावेळी

logo
marathi.freepressjournal.in