मागे न बघता चालकाने रिव्हर्स गिअर टाकला; लक्झरी बसच्या चाकाखाली एकजण चिरडला

लक्झरी बसचालकाने पाठीमागे कुणी व्यक्ती उभी असल्याची खात्री न करता बस पाठीमागे घेतल्याने पाठीमागील चाकाखाली चिरडल्यामुळे...
मागे न बघता चालकाने रिव्हर्स गिअर टाकला; लक्झरी बसच्या चाकाखाली एकजण चिरडला
(प्रातिनिधिक छायाचित्र)

नवी मुंबई: पनवेल तालुक्यातील आपटा फाटा येथील एका हॉटेल समोर उभ्या असलेल्या एका लक्झरी बसचालकाने पाठीमागे कुणी व्यक्ती उभी असल्याची खात्री न करता बस पाठीमागे घेतल्याने सदर बसच्या पाठीमागील चाकाखाली येऊन एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गत सोमवारी रात्री घडली. पनवेल तालुका पोलिसांनी या प्रकरणातील लक्झरी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. पनवेल तालुक्यातील आपटा फाटा येथील शिव फ्युअर व्हेज या हॉटेलच्या पार्किंगमध्ये तारा गावातील वाहनचालक त्यांच्या गाड्या तसेच लक्झरी बसेस पार्क करून ठेवत असतात.

गत सोमवारी रात्री या हॉटेलच्या समोर उभ्या असलेल्या एका लक्झरी बसचालकाने बस चालू करताना पाठीमागे कुणी व्यक्ती उभा आहे, याची खातरजमा न करता, आपली बस पाठीमागे घेतली. त्यामुळे या बसच्या पाठीमागे उभा असलेल्या टिक्कू हरी प्रसाद (३२) याला सदर बसची धडक बसली. त्यामुळे तो या बसच्या पाठीमागील चाकाखाली आल्याने तो गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावला. या घटनेनंतर पनवेल तालुका पोलिसांनी लक्झरी बसचालकाविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in