
नवी मुंबई : कांदा शेतकऱ्यांच्या समर्थनात वाशीच्या एपीएमसी बाजारातील कांदा-बटाटा मार्केट २४ ऑगस्ट रोजी बंद ठेवण्यात येणार आहे. कांद्यावर ४० टक्के निर्यात कर लादल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. या शेतकऱ्यांना समर्थन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कांदा-बटाटा बाजाराचे संचालक अशोक वाळूंज म्हणाले की, दिल्लीतील कांदा उपलब्धतेवरून केंद्राने हा निर्णय घेतला आहे. मात्र, महाराष्ट्रात कांद्याच्या उपलब्धतेचा प्रश्न नाही.
एपीएमसी बाजारातील कांद्याची खरेदी किंमत १७ ते २२ रुपये किलो आहे. दोन आठवड्यापूर्वी दुसऱ्या व तिसऱ्या दर्जाचा कांदा १० ते ५ रुपये किलोने उपलब्ध होता.