पनवेल : डेब्रिज टाकणाऱ्या डम्परवर कारवाई

नवीन पनवेलमधील सिडकोच्या मोकळ्या जागेत अनधिकृतपणे डेब्रिज टाकण्यासाठी आलेले ६ डम्पर सिडकोच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने पकडण्याची कारवाई सोमवारी दुपारी नवीन पनवेलमध्ये केली.
पनवेल : डेब्रिज टाकणाऱ्या डम्परवर कारवाई
प्रातिनिधिक छाायाचित्र
Published on

पनवेल : नवीन पनवेलमधील सिडकोच्या मोकळ्या जागेत अनधिकृतपणे डेब्रिज टाकण्यासाठी आलेले ६ डम्पर सिडकोच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने पकडण्याची कारवाई सोमवारी दुपारी नवीन पनवेलमध्ये केली. या कारवाईत पोलिसांनी ६ डम्पर जप्त करून सर्व डम्परचालकांना ताब्यात घेतले आहे. पनवेल शहर पोलिसांनी या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करून सदरचे डेब्रिज टाकण्यास सांगणाऱ्या डेब्रिज माफियांचा शोध सुरू केला आहे.

नवीन पनवेल सेक्टर-२० भागातील सिडकोच्या भूखंड क्रं.१ व ८ वर रेबीट, माती व दगड असे मानवी आरोग्यास धोकादायक असलेले डेब्रिज टाकण्यासाठी काही डम्पर आले होते. याबाबतची माहिती सिडकोच्या पथकाला मिळाल्यानंतर सिडकोच्या पथकाने सेक्टöर २० मध्ये जाऊन पाहणी केली असता, ६ डम्परचालक त्याठिकाणी डेब्रिज टाकत असल्याचे आढळून आले. त्यामुळे सिडकोच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने डेब्रिजने भरलेले ६ डम्पर व त्याच्यावरील चालक खुर्शाद अन्सारी, आशिष कश्यप, दत्ता चव्हाण, मदन औसरमल, राकेश केवट व गौरव महातोर या सहा जणांना ताब्यात घेतले.

या सर्व डम्परचालकांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिडको परिक्षेत्रात अनधिकृत डेब्रिज टाकत असताना कोणी आढळल्यास सिडकोच्या www.cidco.maharashrta.gov.in या वेबसाइटवर तसेच संबंधित पोलीस ठाण्यात कळविण्यात यावे, असे आवाहन सिडकोकडून करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in