पनवेलमधील गावठी दारूची भट्टी उद्ध्वस्त; पनवेल पोलिसांची धडक कारवाई

पोलिसांची चाहूल लागल्याने सदर गावठी दारूची भट्टी चालवणाऱ्यांनी त्या ठिकाणावरून पलायन केले. त्यामुळे पोलिसांनी त्याठिकाणी सापडलेली सुमारे २ लाख रुपये किमतीची गावठी दारू व दारू बनविण्यासाठी लागणारे साहित्य नष्ट केली.
पनवेलमधील गावठी दारूची भट्टी उद्ध्वस्त; पनवेल पोलिसांची धडक कारवाई

नवी मुंबई : पनवेलमधील कुंडेवहाळ डोंगरावरील निर्जनस्थळी गावठी हातभट्टी दारू गाळण्यात येत असलेल्या दारूच्या भट्टीवर शनिवारी दुपारी पनवेल शहर पोलिसांनी छापा मारून सदर दारूची भट्टी उद्ध्वस्त केली. या कारवाईच्या वेळी सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे व इतर अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. या कारवाईत सुमारे दोन लाखाच्या आसपास मुद्देमाल नष्ट करण्यात आला.

पनवेलमधील कुंडेवहाळ येथील डोंगर भागातील निर्जनस्थळी काही व्यक्ती हातभट्टीची दारू गाळण्यासाठी भट्टी लावत असल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शनिवारी दुपारी सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्याह पोलीस पथकाने कुंडेवहाळ येथील डोंगराळ भागातातील गावठी दारूच्या भट्टीवर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांची चाहूल लागल्याने सदर गावठी दारूची भट्टी चालवणाऱ्यांनी त्या ठिकाणावरून पलायन केले. त्यामुळे पोलिसांनी त्याठिकाणी सापडलेली सुमारे २ लाख रुपये किमतीची गावठी दारू व दारू बनविण्यासाठी लागणारे साहित्य नष्ट केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in