३१ मार्चपूर्वी मालमत्ता कर भरा; नवी मुंबई महापालिकेचे नागरिकांना आवाहन

२९ फेब्रुवारी २०२४ रोजीच जाहीर करण्यात आलेल्या ‘मालमत्ताकर अभय योजना’ अंतर्गत २१ मार्चपासून ३१ मार्च २०२४ पर्यंत थकीत मालमत्ता करासह शास्तीची केवळ ५० टक्के रक्कम भरणा करावी लागणार आहे.
३१ मार्चपूर्वी मालमत्ता कर भरा;  नवी मुंबई 
महापालिकेचे नागरिकांना आवाहन
Published on

नवी मुंबई : मालमत्ता कर हा नवी मुंबई महापालिकेच्या महसुलाचा महत्त्वाचा स्त्रोत असून, मालमत्ताकरामार्फत प्राप्त होणाऱ्या निधीतून विविध नागरी सुविधा कामे करण्यात येत असतात. त्यादृष्टीने मालमत्ताकर वसुलीचे उद्दिष्ट साध्य होण्यासाठी नियोजनबद्ध पावले उचलण्यात येत आहेत.

याकरिता २९ फेब्रुवारी २०२४ रोजीच जाहीर करण्यात आलेल्या ‘मालमत्ताकर अभय योजना’ अंतर्गत २१ मार्चपासून ३१ मार्च २०२४ पर्यंत थकीत मालमत्ता करासह शास्तीची केवळ ५० टक्के रक्कम भरणा करावी लागणार आहे. म्हणजेच शास्तीच्या रकमेत ५० टक्के सूट मिळणार आहे. त्यामुळे मालमत्ताकर अभय योजनेचा लाभ घेऊन नागरिकांनी थकीत मालमत्ताकरावरील शास्तीच्या रकमेत भरीव सूट प्राप्त करून घ्यावी, असे आवाहन नवी मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे नागरिकांनी आपला विद्यमान मालमत्ताकर ३१ मार्चपूर्वी विहित वेळेत भरून शहर विकासास हातभार लावावा, असेही आवाहन करण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in