Navi Mumbai : दात घासताना चक्क टूथब्रश गिळला; डॉक्टरांनी शस्त्रक्रियेशिवाय काढला बाहेर

दात घासताना चुकून टूथब्रश गिळलेल्या ५० वर्षीय रिक्षाचालकाचे नवी मुंबईतील मेडिकव्हर रुग्णालयात शस्त्रक्रियेशिवाय उपचार करण्यात आले. डॉक्टरांनी एंडोस्कोपीद्वारे तब्बल १९ सेंटीमीटर लांबीचा टूथब्रश सुरक्षितपणे बाहेर काढला.
Navi Mumbai : दात घासताना चक्क टूथब्रश गिळला; डॉक्टरांनी शस्त्रक्रियेशिवाय काढला बाहेर
Navi Mumbai : दात घासताना चक्क टूथब्रश गिळला; डॉक्टरांनी शस्त्रक्रियेशिवाय काढला बाहेर
Published on: 

पेण : दात घासताना चुकून टूथब्रश गिळलेल्या ५० वर्षीय रिक्षाचालकाचे नवी मुंबईतील मेडिकव्हर रुग्णालयात शस्त्रक्रियेशिवाय उपचार करण्यात आले. डॉक्टरांनी एंडोस्कोपीद्वारे तब्बल १९ सेंटीमीटर लांबीचा टूथब्रश सुरक्षितपणे बाहेर काढला. उपचारानंतर काही तासांतच रुग्णाला घरी सोडण्यात आले.

पेण येथील राजेंद्र मालुसरे हे सकाळी दात घासत असताना चुकून त्यांच्या पोटात टूथब्रश गेला. सुरुवातीला स्थानिक डॉक्टरांकडे उपचार घेतल्यानंतर त्यांना पुढील तपासणीसाठी नवी मुंबईतील मेडिकव्हर रुग्णालयात पाठविण्यात आले. एंडोस्कोपीमध्ये संपूर्ण टूथब्रश पोटात अडकल्याचे स्पष्ट झाले.

गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. रावसाहेब राठोड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सुमारे ३० मिनिटांची एंडोस्कोपी प्रक्रिया करून टूथब्रश बाहेर काढला.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)