'पिक्चर' बघून परतणाऱ्या दांम्पत्यासोबत दुर्दैवी घटना, अंतोरे खाडी पुलावरून पडल्याने विवाहितेचा मृत्यू

पतीच्या डोळ्यात कचरा गेल्याने पत्नी स्नेहा ही दुचाकीवरून खाली उतरून मोबाईल बॅटरीच्या साहाय्याने पतीच्या डोळ्यातील कचरा पाहत होती. पण अचानक...
'पिक्चर' बघून परतणाऱ्या दांम्पत्यासोबत दुर्दैवी घटना, अंतोरे खाडी पुलावरून पडल्याने विवाहितेचा मृत्यू

पेण : पेण तालुक्यातील वरेडी गावातील दांम्पत्य चित्रपट बघून शनिवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास परत येत असताना घडलेल्या दुर्दैवी घटनेत विवाहित महिलेचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील वरेडी येथे राहणारे प्रशांत चंद्रकांत पाटील (२५) व त्याची पत्नी स्नेहा प्रशांत पाटील (२०) हे दांपत्य शहरात सिनेमा पाहण्यासाठी गेले होते. रात्री सिनेमा पाहिल्यानंतर वरेडी येथे येत असताना अंतोरे पुलाजवळ आले असता प्रशांत याच्या डोळ्यात कचरा गेल्याने पत्नी स्नेहा ही खाली उतरून मोबाईल बॅटरीच्या साहाय्याने पतीच्या डोळ्यातील कचरा पाहत असताना तिचा अचानक तोल गेला आणि ती पुलाखालील पाण्यात पडली. तिला वाचवण्यासाठी तिच्या नवऱ्याने तिला हात दिला. परंतु तोही मोटारसायकलसह खाली पडला, त्यावेळी तिथे झालेल्या आरडाओरडानंतर आलेल्या नागरिकांनी प्रशांत पाटील याच्यासह मोटारसायकल वर काढली. मात्र रात्रीचा पाण्याचा अंदाज न आल्यामुळे आजूबाजूला अडकून पडलेल्या स्नेहा पाटीलचा मृतदेह दोन तासानंतर नागरिकांच्या हाती लागला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in