पनवेलमध्ये दगडखाणीतील 'ब्लास्टिंग'वेळी पोकलेन ऑपरेटरचा मृत्यू

पनवेलमधील कुंडेवहाळ येथील ॲॅन्थोनी भोईर यांच्या दगडखाणीत केलेल्या ब्लास्टिंग दरम्यान उडालेले दगड कामगारांना लागल्याने पोकलेन ऑपरेटरचा मृत्यू, तर इतर दोन कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली.
पनवेलमध्ये दगडखाणीतील 'ब्लास्टिंग'वेळी पोकलेन ऑपरेटरचा मृत्यू

नवी मुंबई : पनवेलमधील कुंडेवहाळ येथील ॲॅन्थोनी भोईर यांच्या दगडखाणीत केलेल्या ब्लास्टिंग दरम्यान उडालेले दगड कामगारांना लागल्याने पोकलेन ऑपरेटरचा मृत्यू, तर इतर दोन कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. त्यामुळे पनवेल शहर पोलिसांनी ब्लास्टिंग करणाऱ्या विरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.

पनवेल तालुक्यातील कुंडेवहाळ येथील ॲॅन्थोनी भोईर यांच्या दगडखाणीत सोमवारी सकाळी ७ वाजल्यापासून ब्लास्टिंगचे काम सुरू होते. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास मोठे ब्लास्टिंग केले. त्यातून उडालेले मोठमोठे दगड त्याठिकाणी कामाला असलेल्या कामगारांना लागले. त्यामुळे हेल्पर अंकितकुमार साह (१८), पोकलेन ऑपरेटर अविनाश कुजुर (३२) व सुपरवायझर सुरेश निरगुडा (२७) हे तिघे गंभीर जखमी झाले. त्यामुळे या तिघांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यात पोकलेन ऑपरेटर अविनाश कुजुर याला पाठीत व पोटात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पनवेल शहर पोलिसांनी या घटनेला जबाबदार धरून ब्लास्टिंग करणारा कुलामणी राऊत याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in