दोन सर्व्हिस बारवर पोलिसांची कारवाई; ५२ महिला वेटर, २५ पुरुष वेटर, २ मॅनेजर व ३० ग्राहक ताब्यात

बारमधील महिला वेटर ग्राहकासोबत हॉटेल व उपहारगृहे आणि मद्यपान कक्षामध्ये बीभत्स वर्तन व अश्लील हावभाव करताना आढळून आल्या. त्यानुसार पोलिसांनी नेरूळमधील रेड सोज या सर्व्हिस बारमधील २६ महिला वेटर, ९ पुरुष वेटर, मॅनेजर व १६ ग्राहक अशा एकूण ५१ जणांना ताब्यात घेतले
दोन सर्व्हिस बारवर पोलिसांची कारवाई; ५२ महिला वेटर, २५ पुरुष वेटर, २ मॅनेजर व ३० ग्राहक ताब्यात

नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने नेरूळमधील रेड रोझ व पनवेलमधील गोपिका या दोन लेडीज सर्व्हिस बारवर छापा मारून बारमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अश्लील हावभाव व अंगविक्षेप करणाऱ्या ५२ महिला वेटर तसेच २५ पुरुष वेटर २ मॅनेजर आणि ३० ग्राहक अशा एकूण १०९ जणांवर कारवाई करून त्यांना ताब्यात घेतले आहे.

नेरूळमधील रेड रोझ व पनवेलमधील गोपिका या लेडीज सर्व्हिस बारमध्ये बारबालाकडून गिऱ्हाईकासोबत बीभत्स वर्तन करण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्या अनुषंगाने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तयार करण्यात आली. यातील सहाय्यक पोलीस आयुक्त वाघमारे यांच्या पथकाने नेरूळमधील रेड रोज या लेडीज सर्व्हिस बारवर छापा टाकला, तर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांच्या पथकाने पनवेलमधील गोपिका या लेडीज सर्व्हिस बारवर छापा टाकला.

यावेळी दोन्ही बारमधील महिला वेटर ग्राहकासोबत हॉटेल व उपहारगृहे आणि मद्यपान कक्षामध्ये बीभत्स वर्तन व अश्लील हावभाव करताना आढळून आल्या. त्यानुसार पोलिसांनी नेरूळमधील रेड सोज या सर्व्हिस बारमधील २६ महिला वेटर, ९ पुरुष वेटर, मॅनेजर व १६ ग्राहक अशा एकूण ५१ जणांना ताब्यात घेतले, तर घोरपडे यांच्या पथकाने गोपिका लेडीज सर्व्हिस बारमधून २६ महिला वेटर, १७ पुरुष वेटर, १ मॅनेजर व १४ ग्राहक अशा एकूण ५८ व्यक्तींना ताब्यात घेतले. या सर्वांविरुद्ध नेरूळ आणि पनवेल तालुका पोलीस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in