बनावट एटीएम कार्डद्वारे पैसे काढणारे पोलिसांच्या ताब्यात

पेणमधील आरडीसीसी बँकेच्या एटीएम मशीनमधून वेगवेगळ्या नावाच्या एटीएम कार्डचा वापर करून १० हजार रुपये काढण्यात आले.
बनावट एटीएम कार्डद्वारे पैसे काढणारे पोलिसांच्या ताब्यात
Published on

पेण : पेण येथील आरडीसीसी बँकेच्या एटीएम मशीनमधून बनावट एटीएएम कार्डद्वारे १० हजार रुपये काढणाऱ्या दोन भामट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पेणमधील आरडीसीसी बँकेच्या एटीएम मशीनमधून वेगवेगळ्या नावाच्या एटीएम कार्डचा वापर करून १० हजार रुपये काढण्यात आले.

या प्रकरणी आरडीसीसी बँकेचे कर्मचारी मिलिंद पाटील यांनी पेण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पेण पोलिसांनी या प्रकरणी तपास करून अजय बळवंत सिंग (२८), नितीन फत्तु सिंग, (१९) या दोन भामट्यांना गजाआड केले आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समद बेग हे करीत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in