अरेबियन नाईट पबवर पोलीसांचा छापा; नशा करण्यासाठी जमलेले ६५ जण ताब्यात

अरेबियन नाईट पबमध्ये ग्राहकांना बेकायदेशीरपणे सिगारेट व हुक्का पिण्यासाठी पुरविण्यात आल्याचे आढळून आले आहे
अरेबियन नाईट पबवर पोलीसांचा छापा;  नशा करण्यासाठी जमलेले ६५ जण ताब्यात

एपीएमसीतील सत्रा प्लाझा इमारतीत पहाटेपर्यंत सुरू असलेल्या अरेबियन नाईट पबवर परिमंडळ-१च्या पोलीस उपआयुक्ताच्या अधिपत्याखालील पथकाने सोमवारी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास छापा मारला. सदर पबमध्ये नशा करण्यासाठी जमलेल्या ६० तरुण-तरुणी तसेच ५ वेटर अशा एकूण ६५ जणांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी हुक्का ओढण्यासाठी लागणारे साहित्य तसेच हुक्का फ्लेवर व इतर साहित्य जप्त केले आहे.

दरम्यान, स्मोकिंग झोन नसताना पहाटेपर्यंत अरेबियन नाईट पबमध्ये ग्राहकांना बेकायदेशीरपणे सिगारेट व हुक्का पिण्यासाठी पुरविण्यात आल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सदर पब चालकासह वेटर आणि ग्राहक अशा सर्वांविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सतरा प्लाझा या इमारतीतील पाम अॅटलांटिका या ११६ नंबरच्या गाळ्यामध्ये सुरु असलेल्या अरेबियन नाईट्स पबमध्ये मद्यधुंद तरुण तरुणींचा पहाटेपर्यंत धिंगाणा सुरू असल्याची माहिती परिमंडळ-१चे पोलीस उपआयुक्त विवेक पानसरे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस अपआयुक्तांच्या अधिपत्या-खालील पथकाने सोमवारी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास अरेबियन नाईट्स या पबवर छापा मारला. यावेळी सदर पबमध्ये ६० तरुण तरुणी हे मद्यधुंद अवस्थेत गर्दी करून धिंगाणा घालताना आढळून आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in