निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उरणमध्ये पोलिसांचा रूट मार्च

उरण एसटी स्टँड चार फाटा येथून उरण शहरातून राजपालमार्गे उरण कोर्टपर्यंत व मोरा पोलीस ठाणे हद्दीतील हनुमान कोळीवाडा येथून बेलदार वाडामार्गे हनुमान मंदिर मोरा जेटीपर्यंत या रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उरणमध्ये पोलिसांचा रूट मार्च
Published on

उरण : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी उरण पोलीस ठाणे हद्दीत एरिया डॉमिनेशन (क्षेत्र परिचय) आणि रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते. सकाळच्या दरम्यान जासई पोलीस चौकी येथून जासई गावामधून दी. बा. पाटील मंगल कार्यालयपर्यंत, तसेच उरण एसटी स्टँड चार फाटा येथून उरण शहरातून राजपालमार्गे उरण कोर्टपर्यंत व मोरा पोलीस ठाणे हद्दीतील हनुमान कोळीवाडा येथून बेलदार वाडामार्गे हनुमान मंदिर मोरा जेटीपर्यंत या रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हा रूट मार्च काढला होता. सदर रूट मार्चमध्ये उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सतिश निकम, पोनि (गुन्हे) सूर्यकांत कांबळे, ०८ सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक, ३० पोलीस अंमलदार तसेच मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वपोनि सुनील शिंदे, ०१ सहाय्यक पोलीस निरीक्षक,११ पोलीस अंमलदार यांच्यासह आरपीएफचे ३ अधिकारी ३० अंमलदार असे शस्त्रे, लाठी, हेल्मेट व वाहनांसह सहभागी झाले होते.

logo
marathi.freepressjournal.in