
नवी मुंबई : महत्त्वाच्या कामाचे कारण सांगून एका महिलेस शीतपेयातून गुंगीचे औषध पाजून तिच्यावर बलात्कार करणाऱ्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीने पीडित महिलेची बदमानी करण्याच्या उद्देश्याने झाल्या प्रकारचे चित्रीकरणही केले होते. या प्रकरणी त्याला मदत करणाऱ्या नातेवाईकांच्या विरोधातही आय टी कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहार.
मुंबईत राहणाऱ्या एका महिलेस महत्वाचे काम आहे असे सांगून बाळू शिंदे नावाच्या व्यक्तीने नवी मुंबईतील एका लॉज वर बोलावले होते. लॉज वर त्या महिलेस शीतपेयातून त्याने गुंगीचे औषध पाजले. तिची शुद्ध हरपताच तिचे लैंगिक शोषण केले गेले. तसेच आक्षेपार्ह चित्रीकरण करून फोटोही काढले. तिची बदनामी करण्याच्या उद्देशाने हे फोटो आणि चित्रीकरण बाळू शिंदे याची विवाहित मुलगी आणि मुलाने व्हायरल केले. ही बाब लक्षात आल्यावर पीडित महिलेने या प्रकरणी मुंबईतील पोलीस ठाण्यात संशयित तिन्ही व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल केली.