डान्स बार परवाना रद्द करण्याची शिफारस; स्थानिक पोलीस ठाण्यातील निष्क्रियता चव्हाट्यावर

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील ऑर्केस्ट्रा बारमध्ये मागील काही दिवसांत पोलीसांनी आस्थापनांच्या तपासण्या केल्या होत्या.
File Photo
File Photo

नवी मुंबई : नवी मुंबईतील कोपरखैरणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत नटराज नावाचे ऑर्केस्ट्रा बार आहे; मात्र सदर बार ऑर्केस्ट्राच्या नावाखाली बिनदिक्कत डान्स बार चालवतात. दुर्दैवाने या बारवर स्थानिक पोलीस ठाण्याने कारवाई कधी केली नाही; मात्र गुन्हे शाखेने जेव्हा जेव्हा कारवाई केली त्यावेळी ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्स बार सुरू असल्याचे समोर आले. शेवटी परवानाच रद्द करा, अशी शिफारस करण्यात आली आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील ऑर्केस्ट्रा बारमध्ये मागील काही दिवसांत पोलीसांनी आस्थापनांच्या तपासण्या केल्या होत्या. त्यामध्ये कोपरखैरणे, नवी मुंबई परिसरातील हॉटेल नटराज रेस्टॉनंट ॲण्ड बार या अस्थापनेची तपासणी १९ ऑक्टोबर रोजी करण्यात आली होती. तपासणी दरम्यान सदर आस्थापनाने दिलेल्या परवान्याचे व नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्याने सदर आस्थापनेचा परवाना रद्द करावा, असा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. याबाबत मा. पोलीस आयुक्त यांनी सुनावणी घेऊन, सदर आस्थापनेकडून नियमांचे, अटींचे उल्लंघन झाल्याची खात्री झाल्याने सदर आस्थापनेचा ऑर्केस्ट्रा परवाना रद्द करण्याचे आदेश ५ जानेवारीला जारी करण्यात आले आहेत. यापुढे सुद्धा बार आस्थापनांमध्ये होणाऱ्या नियमांच्या उल्लंघनाबाबत कडक कारवाई जारी ठेवली जाणार आहे, अशी माहिती मुख्यालय पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in