सीकेटी विद्यालयातील विज्ञान प्रयोगशाळेचे नूतनीकरण

यावेळी संस्थेचे उपकार्याध्यक्ष वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. सिद्धेश्वर गडदे यांच्यासह सीकेटी संकुलातील विविध विभाग प्रमुख तसेच सर्व शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.
सीकेटी विद्यालयातील विज्ञान प्रयोगशाळेचे नूतनीकरण

पनवेल : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील सीकेटी विद्यालयातील विज्ञान प्रयोगशाळेचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले. या नवीन विज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन रामशेठ ठाकूर यांच्याहस्ते करण्यात आले.

या प्रयोग शाळेमुळे इंग्रजी मराठी माध्यमिक विभाग आणि ज्युनिअर कॉलेज विभागातील सर्व विद्यार्थ्यांसाठी विज्ञानातील शास्त्रीय प्रयोग उत्कृष्टरीत्या अभ्यास करून ज्ञानार्जन करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. यावेळी रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या या प्रयोगशाळेचा लाभ भविष्यात ज्ञानार्जनासाठी करता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. या प्रयोगशाळेसाठी माजी खासदार रामशेठ ठाकूर तसेच उपकार्याध्यक्ष, सचिव आणि इतर पदाधिकाऱ्यांचे मोलाचे मागर्दशन आणि सहकार्य लाभल्याबद्दल मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांनी आभार मानले.

यावेळी संस्थेचे उपकार्याध्यक्ष वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. सिद्धेश्वर गडदे यांच्यासह सीकेटी संकुलातील विविध विभाग प्रमुख तसेच सर्व शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in