सुनील पवार यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती

शासनाने उपमुख्य कार्यकारी अधिकारी संघरत्ना खिल्लारे यांची नवी मुंबई महानगरपालिकेत उपआयुक्त म्हणून प्रतिनियुक्तीने नियुक्ती केली आहे. आयुक्त शिंदे यांनी खिल्लारे यांच्याकडे विधी विभाग आणि संचालक, दिव्यांग शिक्षण, प्रशिक्षण व सेवा सुविधा केंद्राचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे.
सुनील पवार यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती

नवी मुंबई : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त सुनील पवार यांची शासनाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. आयुक्त कैलास शिंदे यांनी सुनील पवार यांच्याकडे अतिरिक्त आयुक्त (१) पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये मालमत्ता कर, स्थानिक संस्थाकर, जनसंपर्क विभाग, माझी वसुंधरा, घनकचरा, परवाना आदी विभागांचे कामकाजाचा सामावेश आहे. मालमत्ता कर विभाग हा महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे.

महापालिकेतील हे खाते 'मलाईदार' खाते म्हणून ओळखले जाते. यापूर्वी माजी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्याकडे हे खाते असताना उपायुक्त दर्जाचा अधिकारी देण्यात आला नव्हता. त्यामुळे सर्व फाईली प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून थेट ढोले यांच्याकडे जात होत्या; मात्र माजी आयुक्त राजेश नार्वेकर यांनी अखेरच्या दिवशी उपायुक्त शरद पवार यांच्याकडे उपायुक्त कर (मालमत्ता आणि अन्य कर) अशी जबाबदारी सोपवली आहे. अतिरिक्त आयुक्तांचा मालमत्ता कर विभागावर असलेला "प्रभाव" सध्याचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांना दाखवता येईल का अशी चर्चा पालिका वर्तुळात आज दिवसभर होती.

शासनाने उपमुख्य कार्यकारी अधिकारी संघरत्ना खिल्लारे यांची नवी मुंबई महानगरपालिकेत उपआयुक्त म्हणून प्रतिनियुक्तीने नियुक्ती केली आहे. आयुक्त शिंदे यांनी खिल्लारे यांच्याकडे विधी विभाग आणि संचालक, दिव्यांग शिक्षण, प्रशिक्षण व सेवा सुविधा केंद्राचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे.

logo
marathi.freepressjournal.in