बनावट इनपूट टॅक्स क्रेडिटचा घोटाळा उघड; संत ट्रेडिंग कपनीच्या मालकाला अटक
नवी मुंबई : प्रत्यक्षात क्स्तू किंवा सेवा न मिळवता ७३.३५ कोटी रुपयांच्या खोट्या व बनावट पावत्यांचा वापर करुन इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवणाऱ्या मे संत ट्रेडिंग कंपनीवर बेलापूर सीजीएसटी अर्थात केंद्रीय क्स्तू आणि सेवा कर मंडळ आयुक्तालयाच्या अधिकाऱ्याऱ्यांनी छापा मारुन १३.२० कोटी रुपयांचा बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटचा घोटाळा उघडकीस आणला आहे. या कारवाईनतर सीजीएसटीच्या अधिकाऱ्यांनी सदर कंपनीच्या मालकाला अटक केली आहे.
बेलापूर सीजीएसटीच्या अधिकाऱ्यांनी केंद्र सरकारकडून मिळालेल्या गुप्त माहितीनंतर मोबाइल रिचार्ज व टेलिकॉम सेवा क्षेत्रात कार्यरत असलेल्या संत ट्रेडिंग कंपनीच्या कार्यालयावर गत आठवड्यात छापा मारला होता. तसेच या कंपनीच्या सर्व व्यवहारांची तपासणी केली होती. अधिक तपासात सदर कंपनीने ७३.३५ कोटी रुपयांच्या खोट्या व बनावट पावत्यांचा वापर करुन १३.२० कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळविल्याचे आढळून आले.
त्यानंतर सीजीएसटीच्या अधिकाऱ्यांनी मे संत ट्रेडिंग कंपनीविरोधात १९ जून रोजी २०१७ मधील कलम १३२ (१) (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करुन कंपनीच्या मालकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. या चौकशीत त्याने कोणताही इनवर्ड सप्लाय घेतलेला नसताना बनावट इनव्हॉइसच्या आधारे त्याने ही फसवणूक केल्याचे कबुल केले. त्यानंतर त्याला दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला ३ जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. जीएसटी विभागाकडुन या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे.
बनावट पावत्यांचा वापर
तपासात संत ट्रेडिंग कंपनीने मि. जेट लाइनर एव्हिएशन टेक्निक प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेसोबत बेकायदेशीर व्यवहार केल्याचे तसेच सदर कंपनीने कोणत्याही वस्तूंचा प्रत्यक्ष व्यापार किंवा व्यवहार केला नसल्याचे आढळुन आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.