अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी बसचालकांचे प्रबोधन; एनएमएमटीच्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या अनुषंगाने विशेष आयोजन

गत आठवड्यात उरणमध्ये एनएमएमटी बसमुळे झालेल्या अपघातात एका दुचाकी चालकाचा मृत्यू तसेच एक जण जखमी झाल्याची घटना घडली होती.
अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी बसचालकांचे प्रबोधन; एनएमएमटीच्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या अनुषंगाने विशेष आयोजन

नवी मुंबई : एनएमएमटी बसच्या अपघातात वाढ होत असल्याने एनएमएमटीच्या बसचालकांमध्ये वाहतुकींच्या नियंमाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई महानगरपालिका परिवहन विभागाच्या घणसोली आगारात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे, नवी मुंबई आरटीओच्या उप प्रादेशिक अधिकारी हेमांगिनी पाटील, तसेच नवी मुंबई महानगरपालिका परिवहन विभागाचे व्यवस्थापक योगेश कडुसकर यांनी एनएमएमटी बसचालकांना रस्ते अपघात, वाहतुकीच्या नियमाबाबत मार्गदर्शन करून त्यांचे प्रबोधन करण्यात आले.

गत आठवड्यात उरणमध्ये एनएमएमटी बसमुळे झालेल्या अपघातात एका दुचाकी चालकाचा मृत्यू तसेच एक जण जखमी झाल्याची घटना घडली होती. या अपघातानंतर संतप्त जमावाने एनएमएमटी बसची तोडफोड केली होती. गेल्या काही महिन्यांमध्ये एनएमएमटी बसच्या अपघातात वाढ होऊ लागल्याने हे अपघात कमी व्हावेत, यासाठी एनएमएमटीचे व्यवस्थापक योगेश कडुस्कर यांनी पुढाकार घेतला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in