९ वर्षांच्या मुलावर मासे विक्रेत्याकडून लैंगिक अत्याचार; पळून जाणाऱ्या नराधमाला अटक

पीडित मुलाने घडल्या प्रकाराची माहिती आपल्या आईला दिल्यानंतर पीडित मुलाच्या आईने आरडाओरड करुन नागरिकांच्या मदतीने त्याला पकडले
९ वर्षांच्या मुलावर मासे विक्रेत्याकडून लैंगिक अत्याचार; पळून जाणाऱ्या नराधमाला अटक

नवी मुंबई : खांदा कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका ९ वर्षीय मुलावर एका मासे विक्रेत्याने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सनाउल्ला हकिम शेख (३८) असे या नराधम व्यक्तीचे नाव असून, तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. खांदेश्वर पोलिसांनी त्याला लैंगिक अत्याचार व पोक्सो कलमाखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या प्रकरणातील नराधम आरोपी सनाऊल्ला शेख हा मस्जीद बंदर येथील कुर्ला इस्टेटमध्ये राहण्यास असून, तो वेगवेगळया भागात जाऊन मासे विक्री करतो. रविवारी आरोपी सनाऊल्ला खान हा खांदा कॉलनी परिसरात मासे विक्री करण्यासाठी गेला होता. मासे विक्री केल्यानंतर दुपारी १ वाजण्याच्या सुमारास आरोपीने त्याच भागात खेळत असलेल्या एका ९ वर्षांच्या मुलाला इमारतीच्या टेरेसवर नेऊन त्याला दमदाटी करून त्याच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर तो पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पीडित मुलाने घडल्या प्रकाराची माहिती आपल्या आईला दिल्यानंतर पीडित मुलाच्या आईने आरडाओरड करुन नागरिकांच्या मदतीने त्याला पकडले. त्यानंतर नागरिकांनी त्याला मारहाण करून खांदेश्वर पोलिसांच्या ताब्यात दिले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in