नवी मुंबईत शिंदे गटाचा भगवा फडकेल-विजय नाहटा

शिवसैनिकांनी जनतेमध्ये मिसळून काम करावीत, आगामी काळात नवी मुंबईत भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी नेरूळ येथे बोलताना केले.
नवी मुंबईत शिंदे गटाचा भगवा फडकेल-विजय नाहटा
Published on

नवी मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सामान्य जनतेसाठी विविध सकारात्मक निर्णय घेत आहेत. जनतेशी नाळ जोडलेला मुख्यमंत्री आपणास लाभल्याने नवी मुंबईत मोठ्या संख्येने शिवसेना पक्षात कार्यकर्त्यांचे प्रवेश होत आहेत. शिवसैनिकांनी जनतेमध्ये मिसळून काम करावीत, आगामी काळात नवी मुंबईत भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी नेरूळ येथे बोलताना केले.

शिवसेना बेलापूर विधानसभा मतदारसंघांतील नेरूळ (पूर्व) येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्या हस्ते करण्यात आहे. यावेळी बोलताना विजय नाहटा पुढे म्हणाले की, ऐरोली आणि बेलापूर दोन्ही विधानसभा आपणास लढवायच्या आहेत, त्यानंतर लगेचच महापालिका निवडणुका आहेत. कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असा सल्ला यावेळी विजय नाहटा यांनी दिला. तर नवी मुंबई शहर कोणाएका नेत्यांची मक्तेदारी नाही, इथे कोणाची दादागिरी सहन करणार नसल्याचे जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी यावेळी बोलताना सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीत बेलापूर मतदारसंघातून भाजप अध्यक्ष संदीप नाईक, विद्यमान भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे आणि भाजपचा मित्र पक्ष असलेले शिवसेना शिंदे गटाचे विजय नाहटा हे तिघेही इच्छुक आहेत.

बेलापूर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या लगेच मार्गी लागाव्यात, यासाठी ठिकठिकाणी जनसंपर्क कार्यालय सु‌रू करण्यात आल्याचे शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक, महिला, युवा सेना पदाधिकारी उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in