
नवी मुंबई : नेरूळ पोलिसांनी नेरूळ सेक्टर-१४ मधील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर छापा मारून त्याठिकाणी बेकायदेशीररित्या वास्तव्यास असलेल्या सहा बांगलादेशी नागरिकांची धरपकड केली आहे. सदरचे बांगलादेशी नागरिक मागील वर्षभरापासून त्याच इमारतीच्या बांधकाम साईटवर काम करून त्याच ठिकाणी राहत असल्याचे तपासात आढळून आले आहे.
नेरूळमधील सेक्टर १४ येथे सी रिजन्सी या विकासकाच्या साईटवर काही बांगलादेशी नागरिक राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बांधकाम साईटवर छापा मारून सहा बांगलादेशी नागरिक मागील वर्षभरापासून बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असल्याचे आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.