इमारतीचे बांधकाम करण्यासाठी वृक्षांची कत्तल, बेकायदेशीरपणे वृक्षतोड;चौघांविरोधात गुन्हा

गोठीवली गावात राहणाऱ्या एका व्यक्तीने इमारतीचे बांधकाम करण्यासाठी नारळ, आंबा व जांभळाची १५ ते २० वर्षे जुन्या असलेल्या ८ वृक्षांची बेकायदेशीरपणे कत्तल केल्याचा प्रकार उघडकीस आली आहे.
इमारतीचे बांधकाम करण्यासाठी वृक्षांची कत्तल, बेकायदेशीरपणे वृक्षतोड;चौघांविरोधात गुन्हा

नवी मुंबई : गोठीवली गावात राहणाऱ्या एका व्यक्तीने इमारतीचे बांधकाम करण्यासाठी नारळ, आंबा व जांभळाची १५ ते २० वर्षे जुन्या असलेल्या ८ वृक्षांची बेकायदेशीरपणे कत्तल केल्याचा प्रकार उघडकीस आली आहे. नवी मुंबई महापालिकेने या वृक्षतोडीची गंभीर दखल घेऊन जमीन मालकासह सदर जमिनीवर बांधकाम करणारे बांधकाम व्यावसायिक अशा एकूण चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गोठीवली गवातील रत्नदिप पार्कलगत असलेली नारळाची-५, आंबा-२, जांभुळ-१ अशी अंदाजे १५ ते २० वर्षे जुने असलेले वृक्ष बेकायदेशीररीत्या तोडण्यात आल्याची तक्रार ऑगस्ट २०२३ महापालिकेच्या उद्यान विभागाकडे करण्यात आली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने महापालिकेचे सहाय्यक आयुक्त तथा वृक्ष अधिकारी संजय तायडे यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता, १५ ते २० वर्षे जुनी ८ फळझाडे बेकायदेशीररीत्या तोडण्यात आल्याचे निदर्शनास आले. सदरचा भूखंड हा गोठीवली गावात राहणारे रतन रामा म्हात्रे यांचा असल्याची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेच्या वतीने रतन म्हात्रे याला कारणे दाखवा नोटीस बजावून ७ दिवसाच्या आत लेखी खुलासा करण्याबाबत सूचित करण्यात आले होते; मात्र रतन म्हात्रे याने महापालिका कार्यालयात कोणताही खुलासा सादर केला नाही.

सदर वृक्षतोडीबाबत महापालिकेने केलेल्या चौकशीत सदर जागेवर नवीन बांधकाम करण्यासाठी बांधकाम व्यावसायिक कल्याणजी त्याचा मुलगा जनक कल्याणजी तसेच सदर ठिकाणी कामकाज पाहणारा व्यवस्थापक सन्नी सिंग यांनी नवीन इमारतीचे बांधकाम करण्यासाठी सदर जागेवरील वृक्षांची बेकायदेशीररीत्या कत्तल केल्याची माहिती मिळाली. तसेच त्यांनी नवी मुंबई महानगरपालिका वृक्षप्राधिकरण विभागाकडून कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे आढळून आले. त्यामुळे महापालिकेच्या वतीने रतन म्हात्रे, बांधकाम व्यावसायिक कल्याणजी, जनक कल्याणजी आणि व्यवस्थापक सन्नी सिंग या चौघांविरोधात रबाळे पोलीस ठाण्यात महाराष्ट्र मालमत्ता विरुपणास प्रतिबंध अधिनियम तसेच महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

गोठीवली गावात बेकायदेशीररीत्या वृक्षतोड केल्याप्रकरणी चौघा जणांविरोधात रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांनी वृक्षतोड करून त्याठिकाणी सुरू केलेल्या इमारतीच्या अनधिकृत बांधकामाला सुद्धा नोटीस बजावण्यात आली आहे.

- संजय तायडे, सहाय्यक आयुक्त तथा वृक्ष अधिकारी,

नवी मुंबई महापालिका

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in