Navi Mumbai : अत्याधुनिक स्मार्ट मीटरमुळे वीजचोरी उघड

महावितरणच्या नेरुळ विभागातील अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी टीओडी मीटरमध्ये छेडछाड करून होत असलेली वीजचोरी उघडकीस आणली आहे. महावितरणने या प्रकरणी जुईनगर सेक्टर-२३ येथे राहणाऱ्या संजीवनी घरटकर यांच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

नवी मुंबई : महावितरणच्या नेरुळ विभागातील अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी टीओडी मीटरमध्ये छेडछाड करून होत असलेली वीजचोरी उघडकीस आणली आहे. महावितरणने या प्रकरणी जुईनगर सेक्टर-२३ येथे राहणाऱ्या संजीवनी घरटकर यांच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेरुळ येथील महावितरणचे अधिकारी व कर्मचारी काही दिवसापूर्वी जुईनगर सेक्टर-२३ येथे राहणाऱ्या संजीवनी घरटकर यांच्या घरी तपासणीसाठी गेले होते. त्यावेळी घरटकर यांच्या घरातील मीटर ५२ टक्के मंद गतीने चालत असल्याचे आणि त्यावरील सीलमध्ये छेडछाड झाल्याचे निदर्शनास आले. तपासणीअंती मीटरच्या सर्किटमध्ये फेरफार करून वीजचोरी करण्यात येत असल्याचे उघडकीस आले. या तपासणीदरम्यान घरटकर यांच्याकडून एकूण ४०३ युनिटचा गैरवापर झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे महावितरण कंपनीला २२,४४३ रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे आढळून आले.

वीज मीटरमध्ये छेडछाड करणे किंवा वीज वाहिन्यांवर अनधिकृत आकडे टाकणे हा गंभीर गुन्हा असून, यासाठी सहापट दंडासोबत सहा महिने ते पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली जाऊ शकते. त्यामुळे ग्राहकांनी अशा प्रकारच्या कृत्यात सहभागी होऊ नये, अन्यथा त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे.

संजय पाटील, मुख्य अभियंता, महावितरण परिमंडल, भांडुप

महावितरणकडून सध्या बसविण्यात येणारे टीओडी स्मार्ट मीटर थेट महावितरणच्या नेटवर्क सर्व्हरशी जोडलेले असल्याने, त्याच्यामध्ये कुणी छेडछाड केल्यास किंवा त्यात काही बिघाड झाल्यास त्याची त्वरित रिअल टाईम माहिती महावितरणकडे उपलब्ध होते.

logo
marathi.freepressjournal.in