आईचा मारेकरी शोधण्यासाठी मुलाची फरफट; पुष्पा आगाशे हिट अँड रन प्रकरण

आपल्या आईच्या मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आवश्यक असल्याने महापालिका आणि पोलिसांकडे पाठपुरावा करूनही मृत आगाशे यांच्या मुलाला सीसीटीव्ही फुटेज मिळालेले नाही.
आईचा मारेकरी शोधण्यासाठी मुलाची फरफट; पुष्पा आगाशे हिट अँड रन प्रकरण
आईचा मारेकरी शोधण्यासाठी मुलाची फरफट; पुष्पा आगाशे हिट अँड रन प्रकरणसोशल मीडिया
Published on

ठाणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा आगाशेंचा तीन हात नाका या परिसरात हिट अँड रनमुळे मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली होती. ज्या ठिकाणी हा अपघात झाला ते अतिशय वर्दळीचे ठिकाण असून सीसीटीव्ही असताना अद्याप महापालिका आणि पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज न लागल्याने अपघात करणाऱ्याचा शोध पोलिसांना लावता आलेला नाही. दुसरीकडे आपल्या आईच्या मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आवश्यक असल्याने महापालिका आणि पोलिसांकडे पाठपुरावा करूनही मृत आगाशे यांच्या मुलाला सीसीटीव्ही फुटेज मिळालेले नाही. त्यामुळे सीसीटीव्ही असूनही ते कसे तकलादू आहेत हे या अपघातामुळे उघड झाले आहे.

ठाण्यातील तीनहात नाका परिसरात गुरुवारी सकाळी दूध आणण्यासाठी पायी निघालेल्या ७३ वर्षीय पुष्पा आगाशे यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला.

फरार वाहनचालक सापडला नसल्याने पुष्पा आगाशे यांचे पुत्र आशिष आगाशे यांनी घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही कॅमेरा आहेत का याची मागणी केली. या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा आहेत. मात्र, हे कॅमेरे पालिकेचे कि पोलिसांचे याचे उत्तर आशिष आगाशे यांना कोणी देत नाही. आगाशे यांना हाजूरी येथील नियंत्रण कक्षात जाऊन सीसीटीव्ही कॅमेरा बघण्याचे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले. मात्र हे सीसीटीव्ही कुचकामी असल्याचे समोर आले.

logo
marathi.freepressjournal.in