
तळोजा तुरुंगातील कैद्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांना उन्हातान्हात कुठेतरी झाडाखाली बसून आपल्या प्रियजनाची वाट पाहत तिष्ठत बसावे लागत होते. हे गॅलेक्सी कंपनीचे सीएसआर प्रमुख आदर्श नय्यर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तळोजा कारागृहाबाहेर सीएसआर फंडातून एका वेळेस शंभर लोक बसतील, एवढे मोठे प्रतिक्षालय उभे केले आहे. या प्रतिक्षालयाचे उद्घाटन तरुण भार्गव, यु टी पवार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अमित कक्कर सुब्रमण्यम, डॉ. अजित मगदूम, वृषाली मगदूम, मंजू नय्यर जनार्दन म्हात्रे, पोलीस अधिकारी आदी उपस्थित होते.
गॅलेक्सी कंपनीचे सीएसआर प्रमुख आदर्श नय्यर यांनी देशभर तीन हजार ठिकाणी सीएसआरच्या माध्यमातुन लोकोपयोगी प्रकल्प हाती घेऊन ते पूर्ण केले आहेत. तळोजा तुरुंगातील कैद्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांना उन्हातान्हात कुठेतरी झाडाखाली बसून आपल्या प्रियजनाची वाट पाहत तिष्ठत बसावे लागत होते. हे नय्यर यांना समजल्यानंतर त्यांनी तुरुंग अधिक्षक यु.टी.पवार यांची भेट घेतली होती. यावेळी पवार यांनी त्यांना परवानगी देऊन योग्य जागा दाखविल्यानंतर नय्यर यांनी काही महिन्यांमध्ये एका वेळेस शंभर लोक बसतील एवढे मोठे प्रतिक्षालय उभे केले आहे. या प्रतिक्षालयात येणाऱ्या अभ्यागतांसाठी वॉशरुमची सुविधा करण्याबरोबरच त्यासाठी लागणाऱ्ऱ्या पाण्यासाठी बोरवेल लावण्यात आले आहे. त्यामुळे आता त्याठिकाणी २४ तास पाणी उपलब्ध झाले आहे.
भिंतीवर बोधप्रधान चित्रे आणि सुविचार
प्रतिक्षालयाला लागून छोटेसे गार्ड रुम देखील बांधण्यात आले असून प्रवेश कक्षाची डागडुजी सुद्धा करण्यात आली आहे. प्रतीक्षालयात येणाऱ्या अभ्यागतांना आत्मिक शांती मिळावे, यासाठी तेथील भिंतीवर चित्रकार शितल म्हात्रे यांची काही बोध प्रधान चित्रे आणि सुविचार देखील काढण्यात आली आहेत.१५०० कैद्यांची क्षमता असलेल्या या कारागृहात ३००० पेक्षा जास्त कैदी आहेत. त्यांना भेटायला रोज ३५० व्यक्ती याप्रमाणे वर्षाकाठी एक लाख लोक याठिकाणी दूरवरुन येत असतात. प्रतिक्षालय उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर या परिसरात उपस्थितांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.