नवी मुंबईत अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

नवी मुंबई महापालिका बी विभाग नेरूळ कार्यक्षेत्रातील सानपाडा, सेक्टर २१, भूखंड क्र.१ + २ ए, नोड होल्डिंग पाँन्डवर अतिक्रमण केल्याबाबत तेथील अनधिकृत बांधकामधारकांना नोटीस बजाविण्यात आली होती.
नवी मुंबईत अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई
PM
Published on

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका बी विभाग नेरूळ कार्यक्षेत्रातील सानपाडा, सेक्टर २१, भूखंड क्र.१ + २ ए, नोड होल्डिंग पाँन्डवर अतिक्रमण केल्याबाबत तेथील अनधिकृत बांधकामधारकांना नोटीस बजाविण्यात आली होती. त्या नोटीसीची मुदत संपुष्टात येऊन सदर अनधिकृत बांधकाम संबंधितांकडून स्वत:हून हटविण्यात आले नाही.

त्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार, नेरूळ विभाग कार्यालयाच्यावतीने धडक कारवाई करीत २३ जुलै रोजी सानपाडा, सेक्टर २१, नोड होल्डिंग पाँड याठिकाणी उभारण्यात आलेल्या ७ अनधिकृत गोडाऊनवर निष्कासनाची कारवाई करण्यात आलेली आहे. या कावाईच्या माध्यमातून सदर भूखंड मोकळे करण्यात आले आहेत.

सदर कारवाई महापालिका अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. राहुल गेठे यांचे मार्गदर्शनाखाली व नेरूळ विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी डॉ. अमोल पालवे यांच्या नियंत्रणाखाली, अतिक्रमण विभागातील अधिकारी-कर्मचारी, सुरक्षारक्षक, स्थानिक पोलीस यांच्या सहयोगाने करण्यात आली. या मोहीमेकरिता २० मजूर, १ मुकादम, १ गॅस कटर, २ जेसीबी, व १ डम्पर अशाप्रकारे मनुष्यबळ व साधने वापरण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in