नवी मुंबई : मुका असल्याचे भासवून विद्यार्थिनींचे मोबाईल केले लंपास; गुन्हा दाखल

सोमवारी अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होती. परीक्षा हॉलमध्ये जाण्यापूर्वी विद्यार्थी स्वागतिका कक्षातील एका डब्ब्यात आपले मोबाईल जमा करत आत प्रवेश करीत होते.
नवी मुंबई : मुका असल्याचे भासवून विद्यार्थिनींचे मोबाईल केले लंपास; गुन्हा दाखल
(प्रातिनिधिक छायाचित्र)

नवी मुंबई : नवी मुंबईत मुका असल्याचे भासवून मदत मागणाऱ्या व्यक्तीने दोन मोबाईल लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबत नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस त्या चोराचा शोध घेत आहे.

नवी मुंबईतील नेरूळ येथे न्यू क्लियर आयआयटी नावाची खासगी शैक्षणिक संस्था आहे. याच ठिकाणी शिकवणीचे वर्ग घेतले जातात. सोमवारी अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होती. परीक्षा हॉलमध्ये जाण्यापूर्वी विद्यार्थी स्वागतिका कक्षातील एका डब्ब्यात आपले मोबाईल जमा करत आत प्रवेश करीत होते. याच ठिकाणी एक पस्तीस ते चाळीस वयाचा इसम आला. त्याने खाणाखुणा करून बोलता येत नसल्याचे भासवले.

एका सामाजिक संस्थेसाठी मदत गोळा करत असल्याचा कागद स्वागतिकाकडे सुपूर्द केला. स्वागतिका सदर कागद वाचण्यात गुंतल्याचे पाहून त्या मूक व्यक्तीने डब्यातून दोन मोबाईल गुपचूप काढून खिशात टाकले. हे दोन्ही मोबाईल दोन विद्यार्थिनींचे होते. ही बाब लक्षात आल्यावर संस्थाचालक मोहम्मद रिझवान यांनी नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in