शिवसेना शिंदे गटातील ७ पदाधिकाऱ्यांचे निलंबन; बंडखोर उमेदवाराचा प्रचार करणे भोवले

बेलापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मंदा म्हात्रे यांच्या विरोधात प्रचार करणाऱ्या शिवसेना शिंदे गटातील ७ पदाधिकाऱ्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. या पदाधिकाऱ्यांनी पक्ष विरोधी कार्य केल्याने त्यांच्यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.
एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे संग्रहित छायाचित्र
Published on

नवी मुंबई : बेलापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मंदा म्हात्रे यांच्या विरोधात प्रचार करणाऱ्या शिवसेना शिंदे गटातील ७ पदाधिकाऱ्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. या पदाधिकाऱ्यांनी पक्ष विरोधी कार्य केल्याने त्यांच्यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.

शिवसेना पक्षातून निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये सानपाडा येथील उपजिल्हाप्रमुख मिलिंद सुर्यराव, नेरुळचे उपजिल्हाप्रमुख संजय भोसले, दिलीप घोडेकर, तुर्भे विभागप्रमुख अतिश घरत, वाशी विभागाचे सहसंपर्क प्रमुख कृष्णा सावंत, सानपाडा उपविभाग प्रमुख देवेंद्र चोरगे आणि सानपाडाचे विभाग प्रमुख संजय वासकर या ७ पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

बेलापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाच्या ७ पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांचा प्रचार न करता शिंदे गटातील बंडखोर उमेदवार विजय नाहटा यांचा प्रचार सुरू केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in