तळोजा-खारघरच्या पाणीटंचाईवर सिडकोला सात दिवसांचा अल्टिमेटम; मार्च २०२७ पर्यंत तळोजा टँकरमुक्त करण्याचे आश्वासन

तळोजा फेज १, फेज २ आणि खारघर परिसरातील गंभीर पाणीटंचाईच्या प्रश्नावर ऑल इंडिया उलमा बोर्डच्या महिला विंगने सिडको प्रशासनाला सात दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.
तळोजा-खारघरच्या पाणीटंचाईवर सिडकोला सात दिवसांचा अल्टिमेटम; मार्च २०२७ पर्यंत तळोजा टँकरमुक्त करण्याचे आश्वासन
तळोजा-खारघरच्या पाणीटंचाईवर सिडकोला सात दिवसांचा अल्टिमेटम; मार्च २०२७ पर्यंत तळोजा टँकरमुक्त करण्याचे आश्वासनप्रातिनिधिक छायाचित्र
Published on: 

पनवेल : तळोजा फेज १, फेज २ आणि खारघर परिसरातील गंभीर पाणीटंचाईच्या प्रश्नावर ऑल इंडिया उलमा बोर्डच्या महिला विंगने सिडको प्रशासनाला सात दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. पाणीपुरवठ्यात तातडीने सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला. यासंदर्भात महिला विंगच्या पदाधिकाऱ्यांनी रायगड भवन येथे सिडकोच्या जलविभागातील अधिकाऱ्यांची भेट घेतली.

प्रशासनाकडून १५ ते ३० टक्के पाणीकपात सांगितली जात असली, तरी प्रत्यक्षात नागरिकांना ५० टक्क्यांहून अधिक टंचाईचा सामना करावा लागत असल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी केला.

शुक्रवारी जुम्म्याच्या दिवशी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय रद्द करून शटडाऊन अन्य दिवशी हलविण्याची मागणी करण्यात आली. याला अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगण्यात आले. तसेच सात दिवसांत पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्याचे आणि मार्च २०२७ पर्यंत तळोजा टँकरमुक्त करण्याचे आश्वासन देण्यात आले.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)