वडिलांनी iPhone ऐवजी कमी किंमतीचा फोन घेऊन दिल्याने तरुणाची आत्महत्या

काही दिवसांपुर्वी संजयने आपल्या वडीलांकडे दीड लाख रुपये किंमतीचा आयफोन विकत घेऊन देण्याची मागणी केली होती; मात्र वडिलांनी त्याला...
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नवी मुंबई : वडिलांनी दीड लाख रुपयांचा ॲपल आयफोन घेऊन न दिल्याने कामोठेत राहणाऱ्या एका १८ वर्षीय तरुणाने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. संजय रंजीत वर्मा (१८) असे या तरुणाचे नाव असून, सोमवारी रात्री कामोठेमध्ये ही घटना घडली.

या घटनेतील मृत संजय वर्मा हा कामोठे सेक्टर-३४ मध्ये आई वडील व भावासह राहत होता. संजयने वर्षभरापासून शिक्षण सोडले होते. त्यानंतर त्याला दारुचे व अमली पदार्थाचे व्यसन जडले होते. संजयच्या वडिलांनी त्याला व्यसनमुक्ती केंद्रात सुद्धा नेले होते; मात्र त्याच्यावर काही परिणाम झाला नव्हता. काही दिवसांपुर्वी संजयने आपल्या वडीलांकडे दीड लाख रुपये किंमतीचा आयफोन विकत घेऊन देण्याची मागणी केली होती; मात्र वडिलांनी त्याला विवो कंपनीचा कमी किंमतीचा मोबाईल फोन घेऊन दिला होता. त्यामुळे संजय चिडल्याने गत सोमवारी रात्री त्याने घरामध्ये भांडण देखील केले. या भांडणात आईला दुखापत झाल्याने संजयचा लहान भाऊ आईला उपचारासाठी दवाखान्यात घेऊन गेला होता. यादरम्यान, एकटाचा असलेल्या संजयने घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच कामोठे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संजयचा मृतदेह ताब्यात घेतला.

logo
marathi.freepressjournal.in