एपीएमसी मार्केटमध्ये पाणी साचले,पावसामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य

आजूबाजूच्या परिसरात गुडघाभर पाणी साचल्याने प्रवाशांना वाट काढताना मोठी कसरत करावी लागत होती.
एपीएमसी मार्केटमध्ये पाणी साचले,पावसामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य
Published on

बाजारभाव आणि ग्राहकांच्या संख्येत घट झाली असताना दुसऱ्या बाजूला सलग दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये तसेच मॅफ्को मार्केट परिसरात बहुतांश ठिकाणी पाणी साचले. यामुळे मार्केटमधील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून पाचही मार्केटची आवक देखील घटले असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, एपीएमसी मार्केटमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात गुडघाभर पाणी साचल्याने प्रवाशांना वाट काढताना मोठी कसरत करावी लागत होती.

सलग तिसऱ्या दिवशी पावसाने सर्वच शहरांसोबत नवी मुंबईत देखील हजेरी लावत एपीएमसी मार्केटमधील लाखो रुपयांच्या व्यवहारावर पाणी फेरले आहे. मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये प्रतिदिन लाखो रुपयांची उलाढाल होत असते. मात्र पावसामुळे व्यापाऱ्यांना व्यापार करणे कठीण जात आहे. तर आवक घटून देखील जवळपास ४० टक्के माल शिल्लक राहत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. अशातच मुसळधार पावसामुळे हा कचरा सर्वत्र रस्त्यावर पसरून येणाऱ्या जाणाऱ्या ग्राहकांना अथवा मार्केटमधील घटकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पावसामुळे ग्राहकांनी भाजीपाला आणि फळमार्केटमध्ये पाठ फिरवली आहे. तर दुसरीकडे पावसामुळे फळ मार्केटसह सर्व मार्केट आणि मार्केट परिसरात पाणी व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मार्केटमध्ये नासक्या-खराब भाज्या, कांदे व फळांचा खच पाहायला मिळत आहे.

logo
marathi.freepressjournal.in