दत्तमंदिराची संरक्षण भिंत उभी राहणार; सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ८३ लाख मंजूर

नवी मुंबईतील जागृत देवस्थान म्हणून सानपाडा येथील दत्तमंदिर मानले जातात.
दत्तमंदिराची संरक्षण भिंत उभी राहणार; सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ८३ लाख मंजूर

नवी मुंबई : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सानपाडा येथील दत्तमंदिर शेजारी संरक्षक भिंत उभारण्याच्या कामाला शुक्रवारपासून सुरुवात करण्यात आली आहे. त्याचबरोबर रखडलेल्या सेवा रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या दोन्ही कामांनी सणांच्या वेळी शीव-पनवेल मार्गावर होणाऱ्या वाहतूककोंडीपासून नागरिकांची सुटका होणार आहे. या कामांचा शुभारंभ आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आला. 

नवी मुंबईतील जागृत देवस्थान म्हणून सानपाडा येथील दत्तमंदिर मानले जातात. दत्तजयंती व इतर हिंदू धर्मीयांच्या सणांना भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी याठिकाणी होते, मात्र मंदिर नेमके शीव-पनवेल या राज्यातील सर्वाधिक व्यस्त महामार्गानजीक असल्याने अनेक लोक महामार्गावरच गाड्या पार्क करून मंदिरात येतात. तसेच मंदिरात जाण्यातही याच मार्गावरून ये-जा करत असल्याने हिंदी सण आणि त्यातल्या त्यात दत्तजयंतीवेळी वाहतूककोंडी होते.

 दत्तमंदिर शेजारी संरक्षक भिंत उभी करणाऱ्याचे अनेक दिवस स्थानिक लोक प्रयत्न करत होते. कारण दत्तमंदिर हे जागृत देवस्थान आहे. तिथे यात्रा जत्रा भरते व अनेक भाविक दर्शनाला येतात. परंतु काही काळापासून श्री दत्त मंदिरामध्ये जत्रेसाठी येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना रस्ता हा अरुंद पडत असे. त्यामुळे भाविकांना गाड्या ये- जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणत हा त्रास सहन करावा लागत होता व तसेच हजारो लोक  भंडाऱ्याचा लाभ घेतात. त्यासाठी तेथे फार गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेऊन सानपाडा ग्रामस्थांनी आमदार मंदा म्हात्रे यांच्याकडे मागणी केली व मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नांनी हा अनेक वर्षांचा प्रश्न सोडविण्यात आला आहे. आमदार मंदा म्हात्रे  व ग्रामस्थांच्या हस्ते भूमिपूजन केले व कामाला सुरुवात झाली. यामुळे  ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचप्रमाणे ग्रामस्थांच्या अनेक अडचणी ऐकून घेतल्या व त्यावर लवकर मार्ग काढणार आहे. तसेच संबंधित अडचणींवर अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. भूमिपूजनासाठी सदानंद पाटील, बाळराम पाटील, सोमनाथ वस्कर, दिलीप मढवी, महेश मढवी, भार्गव मढवी, रूपेश मढवी, अंबाबाई रघु दळवी, सानपाडा ग्रामस्थ व पालक वर्ग सर्व उपस्थित होते.

कामे अनेक वर्षं रखडलेली

सानपाडा येथील श्री दत्त मंदिराच्या दिशेन जाणाऱ्या सर्व्हिस रोडचे काम गेली अनेक वर्ष रखडलेले होते. आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नाने सर्व्हिस रोड व संरक्षण भिंत यासाठी ४ कोटी मंजूर व ३ कोटी १५ लाख सर्व्हिस रोडसाठी व संरक्षण भिंतीसाठी ८३ लाख मंजूर झालेले आहेत. 

सदर काम अनेक वर्षांपासून रखडले होते. त्यामुळे सायन-पनवेल मार्गावरील वाहतूक आणि भक्त या दोघांनाही त्रास होत होता. मनपा आणि सार्वजनिक विभाग यांच्यात समन्वय साधत अखेर काम मार्गी लागले. या कामांमुळे भक्तांची त्रासातून मुक्ती झाली असून सायन-पनवेल मार्गाची वाहतूककोंडीपासून सुटका होणार आहे. - मंदा म्हात्रे (आमदार)

logo
marathi.freepressjournal.in