डॉक्टरकडून ३० लाखांची खंडणी उकळणाऱ्याचा शोध सुरू

डॉक्टरकडून ३० लाखांची खंडणी उकळणाऱ्याचा शोध सुरू

या प्रकरणातील तक्रारदार हिमांशु राऊत हे नागपूरमध्ये राहण्यास असून ते व्यवसायाने डॉक्टर आहेत.

नवी मुंबई : नागपूरमध्ये राहणाऱ्या हिमांशु राऊत (३४) या डॉक्टरकडून त्याच्या ओळखीतील राकेश पांडुरंग पुसदकरने (३५) व्यवसायात गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने २८ लाख ८३ हजार रुपये उकळल्याचे तसेच त्याला नेरूळमधील एका हॉटेलमध्ये डांबून ठेवून त्याला जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्या वडिलांकडून आणखी ३० लाख रुपये खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नेरूळ पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी राकेश पुसदकरविरोधात खंडणीसह जबरी लूट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

या प्रकरणातील तक्रारदार हिमांशु राऊत हे नागपूरमध्ये राहण्यास असून ते व्यवसायाने डॉक्टर आहेत. तर हिमांशु यांना मारहाण करून त्यांच्याकडून खंडणी उकळणारा आरोपी राकेश पांडुरंग पुसदकर हा देखील नागपूरमध्ये राहणारा आहे. त्यानंतर डॉ. राऊत यांची राकेशसोबत ओळख झाली होती. त्यानंतर मार्च २०२३ मध्ये राकेश पुसदकरने त्याचा पेपर, ज्वेलर व इलेक्ट्रॉनिक्सचा व्यवसाय असल्याचे तसेच सीबीडी बेलापूर येथे मेघराज नावाचा बार असल्याचे सांगून त्याच्या व्यवसायामध्ये गुंतवणूक केल्यास त्यांना चांगला फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते.

त्यामुळे डॉ. राऊत यांनी राकेशवर विश्वास ठेवून व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्यासाठी राकेशला २८ लाख ८३ हजार रुपये दिले होते. त्यावेळी डॉ. राऊत यांना राकेशने बेदम मारहाण केली. तसेच त्यांना जिवंत राहायचे असेल तर मागचे पैसे विसरून जाण्यास सांगितले. तसेच त्याला आणखी ५० लाख रुपये देण्यास बजावले. तसेच पैसे न दिल्यास त्याला हॉटेलमध्येच मारून टाकण्याची धमकी दिली. त्यावेळी घाबरलेल्या डॉक्टरने वडिलांना फोन करून ५० लाखांची मागणी केली. राकेशने डॉ. राऊत यांच्या वडिलांना धमकावून त्यांच्याकडून ३० लाख रुपये उकळले. या प्रकारानंतर घाबरलेले डॉ. राऊत मानसिक तणावाखाली गेले होते. त्यानंतर गत बुधवारी त्यांनी नेरूळ पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली.

logo
marathi.freepressjournal.in