जनावरांची वाहतूक करणारे तिघे अटकेत

गाडीत सहा जनावरे कोंबून, कत्तलीसाठी नेत असल्याचे आढळून आले
जनावरांची वाहतूक करणारे तिघे अटकेत

मोखाडा : मोखाडा पोलिसांच्या नाकाबंदीत, संशयित स्कॉर्पिओ गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, चालकाने पळ काढला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून गाडी पकडली. या गाडीत सहा जनावरे कोंबून, कत्तलीसाठी नेत असल्याचे आढळून आले. यावेळी गाडीसह तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

मोखाडा पोलिसांच्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार, मोखाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदिप गिते यांनी ऑपरेशन ऑल आऊट आणि नाकाबंदी सुरू केली आहे. गुरुवारी नाकाबंदी सुरू असताना, संशयित सफेद स्कॉर्पिओ गाडी पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चालकाने पळ काढला. मात्र ४ किलोमीटरवर पोलिसांनी त्यांना घेरून ताब्यात घेतले. गाडीत सहा जनावरे कोंबून भरल्याचे आढळून आले. याप्रकरणी मोहम्मद शेख, हुसेन शेख, आणि रझ्झाक शेख या तीन जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच वाहनासह सुमारे ४ लाख ३५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in