अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तिघांना अटक; ३१ लाख ७२,९८० मुद्देमाल हस्तगत

कोपरखैरणे पोलीस ठाणे हद्दीतील नॅशनल अपार्टमेंट, चौथ्या माळ्यावर, रूम कमांक ४०४, याठिकाणी दि. १६ तारखेला कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे पथकाने छापा टाकला
अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तिघांना अटक; ३१ लाख ७२,९८० मुद्देमाल हस्तगत
Published on

नवी मुंबई : कोपरखैरणे पोलिसांनी ड्रग्ज विक्री करणारे रॅकेट उद‌्ध्वस्त केले असून याप्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ३१,७२,९८० मुद्देमाल मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

कोपरखैरणे पोलीस ठाणे हद्दीतील नॅशनल अपार्टमेंट, चौथ्या माळ्यावर, रूम कमांक ४०४, याठिकाणी दि. १६ तारखेला कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे पथकाने छापा टाकला. त्यावेळी मोहम्मद शमिम ईस्माईल अन्सारी उर्फ सॅम (२७), खालीदा खातुन मोहम्मद अजीम अन्सारी (२३), आफिया खातुन हयात मोहम्मद अन्सारी (१९) यांना ताब्यात घेण्यात आले. घराची झडती घेतली असता ६ लाख ३० हजार रुपये किमतीची ६३ ग्रॅम वजनाची एमडी पावडर, २५,३०,००० किमतीची २५३ ग्रॅम वजनाची ब्राऊन शुगर पावडर व रोख रक्कम १२,९८० रु. असा एकूण ३१,७२,९८० किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

logo
marathi.freepressjournal.in