गॅसकटरच्या आगीत तीन जणांचा मृत्यू

. या घटनेनंतर गॅस टँकरच्या कटिंगचा प्रकार उघडकीस येऊ नये यासाठी सदर गाळ्यातील इलेक्ट्रिक मीटरमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचा बनाव रचण्यात आला होता.
गॅसकटरच्या आगीत तीन जणांचा मृत्यू

नवी मुंबई : गॅसकटरच्या सहाय्याने गॅस टँकरच्या कटिंगचे काम करत असताना, गॅस टँकरमध्ये शिल्लक राहिलेल्या गॅसने पेट घेतल्याने झालेल्या दुर्घटनेत पाच जण गंभीररीत्या भाजल्याची व त्यातील तिघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना कळंबोलीतील स्टील मार्केटमध्ये उघडकीस आली आहे.

गत ९ जानेवारी रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला होता. या घटनेनंतर गॅस टँकरच्या कटिंगचा प्रकार उघडकीस येऊ नये यासाठी सदर गाळ्यातील इलेक्ट्रिक मीटरमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचा बनाव रचण्यात आला होता. मात्र कळंबोली पोलिसांनी केलेल्या तपासात गॅस टँकरच्या कटिंगचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी या दुर्घटनेत गंभीररीत्या भाजलेल्या गाळा धारकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या दुर्घटनेत मृत झालेल्यामध्ये मुनोवर चिकन शहा (२४), नूर मोहम्मद निगा मोहम्मद (३५) व मोहम्मद कलाम धोटु खान (२४) या तिघांचा तर रुग्णालयात उपचार सुरू असलेल्यामध्ये वसीम शहा जलील शहा (२४) व समशुद्दीन रसिलीउद्दीन सलमानी (४२) या दोघांचा समावेश आहे. कळंबोली पोलिसांनी तपास सुरू केला असताना सदरची दुर्घटना इलेक्ट्रिक मीटरमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागल्यामुळे झोपेत असलेले पाचही जण भाजल्याचा बनाव रचण्यात आला होता. गाळाधारक वसीम शहा जलील शहाने या प्रकरणात पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने गॅसकटर आणि गॅस टँकर हे इतरत्र हलवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे आढळून आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in